मनपाची तिजोरी भरणारांच्या घरात शिरले पावसाचे पाणी!

Foto
सुराणानगर वार्ड क्र. 65 मधील नागरिक रस्ते, कचरा, ड्रेनेज या समस्यांनी हैराण आहेत. शुक्रवारी तर धो-धो पावसाने सुराना नगरातील असंख्य घरात पाणी शिरले. योग्य नियोजन पाण्याच्या नेत्याचे योग्य नियोजन न केल्याने असा प्रकार होत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. एकंदरीत नियमित कर भरून मनपाच्या गंगाजळीत कोट्यवधींची भर घालणार्‍या नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 
गेल्या वीस वर्षांपासून उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या सुराना नगर, विद्यानिकेतन कॉलनी परिसरातील नागरिक असंख्य समस्यांनी त्रस्त आहेत. या वार्डातील प्रत्येक जण नियमितपणे कर भरणा करतो. मनपाच्या गंगाजळीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची भर टाकणार्‍या या परिसराला सुविधा मात्र कोणत्याच नाही. रस्त्यावरील खड्ड्यांनी रहिवाशांना मणक्याचे आजार जडले आहेत. कचरा नियमित उचलला जात नसल्याने कायम दुर्गंधी असते. विशेषतः पावसाळ्यात तर ड्रेनेजचे पाणी रहिवाशांच्या चक्क घरात शिरते. याबाबत गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या. तरी कुणी दखल घ्यायला तयार नाही.
आठव्या दिवशी पाणीपुरवठा !
दरम्यान नियमित घरपट्टी- नळपट्टी भरणार्‍या सुराणा नगरात तब्बल आठवडाभरानंतर पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा केल्या, तरीही ना वार्डाचे नगरसेवक ना मनपा प्रशासन दखल घेते. त्यामुळे आम्हाला वाली तरी कोण ? असा सवाल रहिवासी विचारत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker